Wednesday 7 May 2014

Aniruddha's Academy of Disaster Management (Post in Marathi & English)

।। हरि: ॐ ।।
07-05-2014

Aniruddha's Academy of Disaster Management


परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध (डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी, एम्. डी. मेडिसीन) म्हणजेच बापू पवित्र समन्वयाच्या मार्गाबद्दल प्रवचानांमधून सांगतात. मला त्यातून बोध झाला, तो पुढीलप्रमाणे- विज्ञान आणि अध्यात्म हे परस्परविरोधी नसून उलट परस्परपूरकच आहेत. विज्ञान आणि भक्ती यांची उचित सांगड घालून परमेश्वरी मार्गाने स्वतःसह सर्वांचाच विकास मानव साधू शकतो.
सेवेलाही भक्तीचे अधिष्ठान असणे गरजेचे आहे, जेणेकरून त्या सेवेचा अहंकार मानवाला येत नाही. उलट भगवंताने मला सेवा करण्याची संधी देऊन माझ्या प्रारब्धाचा भार हलका करण्याचा मार्ग दाखविला, ह्या भावनेने मानव भगवंताचा ऋणी राहतो आणि अधिकाधिक सेवादेखील करत राहतो.
 सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या (बापुंच्या) मार्गदर्शनाने ‘अनिरुद्धाज् अ‍ॅकॅडमी ऑफ डिझॅस्टर मॅनेजमेंट’ ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेच्या नावावरूनच आपल्या लक्षात येईल की ही भक्तीचे अधिष्ठान असणारी संस्था आहे, जिच्याद्वारे श्रद्धावान स्वयंसेवक (DMV) भक्तिमय सेवा (Devotional Service) करतात. आपद्ग्रस्तांना सहाय्य करणे हे परमेश्वरी कार्यच आहे, ह्या श्रद्धेने श्रद्धावान स्वयंसेवक आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात, बचाव कार्यात भाग घेतात आणि भक्तीचा पाया असल्यामुळे आपोआपच त्यात निरपेक्ष भाव असतो.


मानवाची कुवत सीमित आहे, पण भगवंताचे सामर्थ्य असीम आहे आणि जे परमेश्वरी मूल्याधारित कार्य करतात, त्यांना भगवंत त्या कार्यात भरभरून सहाय्य करीतच असतो, ह्या जाणिवेतून आपत्ती निवारण कार्याचे प्रशिक्षण घेण्यापासून ते आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) कार्य करण्यापर्यंत प्रत्येक पावलाला श्रद्धावान स्वयंसेवक मनात भगवंताचे स्मरण करत असतात. आपत्ती व्यवस्थापन कार्याच्या सेवेत निरपेक्ष प्रेमाने भाग घेणार्‍या प्रत्येक हाताला विधायक कार्यशक्तीचा पुरवठा करणारे हृदय भक्तीचेच आहे आणि सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या प्रेमाने या कार्यात चैतन्य आहे.


For more information you may log on to http://www.aniruddhasadm.com/
This website provides holistic insights into the functioning, working and other details of A.A.D.M. Some of the important aspects of A.A.D.M. that this website covers are:
Prayer and Preamble of A.A.D.M., Details of the Devotional Services performed by A.A.D.M., various Workshops and Events managed and conducted by A.A.D.M., details of Basic and Other Courses of A.A.D.M., The Third World War (book authored by P. P. Sadguru Shree Aniruddha), Geographic Spread and Presence of A.A.D.M. and its Centres, Reviews, Recommendations and Testimonials about A.A.D.M. by the Seniormost Government Authorities of rank of Chief Fire Officer of Mumbai, Superintendant of Police of Thane Rural District, Additional Director General of Police (P & C) of Maharashtra, Publications by and/or related to A.A.D.M. etc.
One could also find the regular updates on various forthcoming seva opportunities where any D.M.V. (Disaster Management Volunteer) could participate and serve.


For more details you may visit:

http://www.aniruddhasadm.com/


अंबज्ञोऽस्मि

।। हरि: ॐ ।।