Saturday 14 February 2015

परमपूज्य बापुंना सद्‌गुरुनारायणानन्दतीर्थसेवा ट्रस्टद्वारे (श्रीक्षेत्र औदुम्बर) दिल्या गेलेल्या सन्मानपत्राचा मराठीत अर्थ (Post in Marathi)

।। हरि: ॐ ।।
१४-०२-२०१५

परमपूज्य बापुंना सद्‌गुरुनारायणानन्दतीर्थसेवा ट्रस्टद्वारे (श्रीक्षेत्र औदुम्बर) दिल्या गेलेल्या सन्मानपत्राचा मराठीत अर्थ


सद्‍गुरु श्री अनिरुद्ध २०१३ साली दत्तक्षेत्र श्री औदुंबर येथे श्रीगुरु दत्तात्रेयदर्शनास गेले होते. त्यावेळी परमपूज्य बापुंना सद्‌गुरुनारायणानन्दतीर्थसेवा ट्रस्टद्वारे (दत्तक्षेत्र श्री औदुम्बर) दिले गेलेले सन्मानपत्र संस्कृत भाषेत आहे, त्या सन्मानपत्राचा मराठीत अर्थ यथामति देत आहे. चूकभूल द्यावी घ्यावी.

हरि: ॐ परमपूज्य बापुंना सद्‌गुरुनारायणानन्दतीर्थसेवा ट्रस्टद्वारे दिल्या गेलेल्या सन्मानपत्राचा अर्थ मराठीत असा आहे. नमो भगवते दत्तात्रेयाय। दिव्य भगवान श्रीदत्तात्रेयांच्या सान्निध्यात श्रीक्षेत्र औदुम्बर येथे सद्‌गुरु नारायणानन्दतीर्थस्वामीगुरुंच्या सन्निध आपल्या शुभ आगमनप्रसंगी हे सन्मानपत्र दिले जात आहे. (परमपूज्य बापूंच्या सन्मानार्थ सन्मानपत्रात म्हटलं आहे की) हे प्रचंड तेज:संपन्न, महान, समर्थ विभूते! आपल्याकडून अखंडपणे श्रद्धावानजनांच्या समाजासाठी निग्रह-अनुग्रह-शक्तिद्वारे केले जात असलेले उद्धारकार्य जनता जनार्दनाची सेवा या भावनेने केले जात आहे. आपण मानवरूपाने भूतलावर अवतरून अनिरुद्ध नामाने कीर्तिमान झाला आहात. आम्हां देहधारी मानवांसाठी आपले दर्शन होणे हे त्रिकालांचा उद्धार करणारे आहे. श्रद्धावानांचे कल्याण करण्याच्या आपल्या कार्यक्षेत्रात आपण ईश्वरीय लीला आणि अनेकविध गुणांनी शोभून दिसत आहात. आपले दिगन्त यश असेच सदैव आम्ही ऐकत रहावे. अशा प्रकारच्या ईश्वरीय रमणीय गुणगणांनी विभूषित असणाऱ्या आपणास ‘भक्तकामकल्पद्रुम' ,या पदवीने सन्मानित करण्यात येत आहे आणि मन:सामर्थ्यदाता परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या पूज्य चरणी आम्ही गौरवपुरस्काराने विभूषित असे हे सन्मानपत्र सादर अर्पण करत आहोत.
आपले सत्कृपाभिलाषी, विश्वस्त मंडळविकास जगदाळे सद्‌गुरुनारायणानन्दतीर्थसेवाट्रस्ट दत्तक्षेत्र, औदुम्बर, जिल्हा सांगली, महाराष्ट्र गौरवाध्यक्ष आत्माराम एन्‌. नाडकर्णी ऍटर्नी जनरल, सिनियर ऍडव्होकेट हायकोर्ट, गोवा बुधवार दिनांक 1 मे 2013

 * भक्तकामकल्पद्रुम- कल्पद्रुम म्हणजे कल्पवृक्ष. काम म्हणजे धर्ममर्यादेस, पावित्र्यास अनुसरून असणारा कामपुरुषार्थ. भक्तकामकल्पद्रुम म्हणजे भक्तांचा कामपुरुषार्थ पुरविणारा कल्पवृक्ष.

अंबज्ञोऽस्मि ।

 ।। हरि: ॐ ।।