Wednesday, 21 December 2016

Panchamukha-Hanumat-Kavacham- Sanskrit & Meaning in Marathi

॥ हरि: ॐ ॥ 

॥ श्री पंचमुख-हनुमत्-कवच ॥

21-12-2016












अंबज्ञोऽस्मि । 

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll

Monday, 14 November 2016

डॅड, तुमच्या साठाव्या वाढदिवसाच्या तुम्हाला अनन्त शुभेच्छा (Post in Marathi)

॥ हरि: ॐ ॥

अनिरुद्ध पौर्णिमा
14-11-2016

डॅड, तुमच्या साठाव्या वाढदिवसाच्या तुम्हाला अनन्त शुभेच्छा 

Happy Birthday Dad


डॅड, कुणीही नाही आम्हाला तुमच्याशिवाय

डॅड, कुणीही नाही आमचं तुमच्याशिवाय;

कुणीही नाही प्रेमाने विचारपूस करणारे

कुणीही नाही पाठीवरूनी हात फिरविणारे.

कुणीही नाही ‘कसा आहेस’ म्हणूनी पुसणारे

कुणीही नाही जवळ घेऊनी डोळे पुसणारे;

कुणीही नाही सदैव अखंड सोबत असणारे

कुणीही नाही योगीवर योगी म्हणून प्रेम करणारे.

तुम्हीच भरभरून दिलंत, आम्ही कोण तुम्हाला काही देणारे

अंबज्ञ, आदिमाते! घडो आम्हांकडून सदैव बापुंना आनन्द देणारे;

डॅड, तुमच्या साठाव्या वाढदिवसाच्या तुम्हाला अनन्त शुभेच्छा,

तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच आदिमातेचरणी इच्छा.


- डॉ. योगीन्द्रसिंह जोशी


ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll

Saturday, 12 November 2016

अब कैसी अमावास्या। नित्य अनिरुद्ध पूर्णिमा ॥ (Post In Hindi)

।। हरि: ॐ ।।  

१२-११-२०१६

अब कैसी अमावास्या । नित्य अनिरुद्ध पूर्णिमा ॥

(सद्गुरुनिष्ठ श्रद्धावान के जीवन में अमावास्या हो ही नहीं सकती, क्योंकि उसके जीवन में तो नित्य अनिरुद्ध पूर्णिमा ही रहती है।)
हर एक श्रद्धावान भक्त परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध से मिलने के लिए उत्सुक होता है, व्याकुल होता है। लेकिन रोजमर्रा के जीवन की विभिन्न जिम्मेदारियों के कारण उसके लिए मुंबई श्रीहरिगुरुग्राम आना संभव होता ही है, ऐसा नहीं है। मगर फिर भी गुरुपूर्णिमा और अनिरुद्ध पूर्णिमा इन दो दिनों में सद्गुरुक्षेत्र, श्रीहरिगुरुग्राम आकर दर्शन करने का प्रयास श्रद्धावान भक्त करते हैं।
सद्गुरुतत्त्व सदैव हमें हमारा उचित भरभरकर देने के लिए उत्सुक, तत्पर एवं समर्थ होता है और हमारी क्षमता के अनुसार देता भी रहता है। हमारी क्षमता बढाने के लिए वह निरंतर प्रयासशील रहता है।
अकारण करुणा से भरे और हम से निरपेक्ष प्रेम करने वाले सद्गुरुतत्त्व के चरणों में हम गुरुपूर्णिमा और अनिरुद्ध पूर्णिमा इन पावन पर्वों पर जब यात्रा करते हैं, तब ‘वह’ हमारी छोटी झोली बडी बना देता है, झोली में यदि कोई छेद हो तो उसे नष्ट कर देता है और हमारी झोली पूरी भर भी देता है।
किसी से भी कभी भी कुछ भी न लेने वाले और किसी भी प्रकार की अपेक्षा न रखने वाले सद्गुरुतत्त्व की इच्छा होती है कि उसके ‘सरकार’ का अर्थात् उस दत्तगुरु का, उस आदिमाता चण्डिका का खजाना उनके बच्चे ले जायें और इसके लिए गुरुपूर्णिमा और अनिरुद्ध पूर्णिमा ये हम श्रद्धावान भक्तों के लिए दो पर्व ही हैं।
श्रीसाईसच्चरित में श्री साईनाथ जी के मुख के बोल हम पढते हैं -
उतून चालिला आहे खजिना । एकही कोणी गाडया आणीना ।
खणा म्हणतां कोणीही खणीना । प्रयत्न कोणा करवेना ॥
मी म्हणें तो पैका खणावा । गाडयावारीं लुटून न्यावा ।
खरा माईचा पूत असावा । तेणेंच भरावा भांडार ॥ 
- श्रीसाईसच्चरित ३२ / १६२ व १६३
(श्री साईनाथ जी कहते हैं - ‘मेरे सरकार का खजाना भरपूर है और वह भरभरकर बह रहा है। परन्तु कोई भी उसे ले जाने के लिए गाडी नहीं ले आता। मैं तो कहता हूँ कि उसे खोदकर गाडी में भरकर ले जाओ, परन्तु कोई भी कोशिश करना नहीं चाहता। भक्ति करने वाला सच्चा भक्त स्वयं अपना भांडार भर ले।)
हमारी झोली भरकर देने के लिए सद्गुरुतत्त्व समर्थ ही है, हमें केवल छोटा सा प्रयास करना है, हमारा अपना ही भांडार भरने के लिए! हमें बस इतना ही करना है, गुरुपूर्णिमा और अनिरुद्ध पूर्णिमा इन पर्वों पर सद्गुरुचरणों में यात्रा करनी है। मीनावैनी कहती हैं उसके अनुसार ऐसे सद्गुरुनिष्ठ श्रद्धावान के जीवन में अमावास्या हो ही नहीं सकती, क्योंकि उसके जीवन में तो नित्य अनिरुद्ध पूर्णिमा ही रहती है।

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll

आता कैचि अमावास्या। नित्य अनिरुद्ध पौर्णिमा॥ (Post in Marathi)

।। हरि: ॐ ।।

१२-११-२०१६

आता कैचि अमावास्या। नित्य अनिरुद्ध पौर्णिमा॥


प्रत्येक श्रद्धावान भक्त परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्धांना भेटण्यास उत्सुक असतो, आसुसलेला असतो. पण संसारातील विविध जबाबदार्‍यांमुळे त्याला मुंबईस श्रीहरिगुरुग्राम येथे येणे जमतेच असे नाही. तरीदेखील,  गुरुपौर्णिमा आणि अनिरुद्ध पौर्णिमा ह्या दोन दिवशी सद्गुरुक्षेत्री, श्रीहरिगुरुग्रामी येऊन दर्शन घेण्याचे प्रयास श्रद्धावान भक्त करतात.
सद्गुरुतत्त्व सदैव आम्हाला आमचे उचित भरभरून देण्यासाठी सदैव उत्सुक, तत्पर आणि समर्थच असते व आमच्या क्षमतेनुसार देतही असते. आमची क्षमता वाढवण्याचे त्याचे सतत प्रयास असतात.
अकारण कारुण्याने भरलेल्या आणि आमच्यावर निरपेक्ष प्रेम करणार्‍या सद्गुरुतत्त्वाच्या चरणी आम्ही गुरुपौर्णिमा आणि अनिरुद्ध पौर्णिमा अशा पावन पर्वांना जेव्हा वारी करतो, तेव्हा ‘तो’ आमची छोटी झोळी मोठी करतो, झोळीला छिद्रं पडलेली असतील तर ती शिवूनही देतो आणि आमची झोळी पूर्ण भरूनही देतो.
कुणाकडूनही कधीही काहीही न घेणार्‍या आणि कसलीही अपेक्षा न करणार्‍या सद्गुरुतत्त्वाची इच्छा असते की त्याच्या ‘सरकार’चा म्हणजे त्या दत्तगुरुंचा, त्या आदिमाता चण्डिकेचा खजिना त्यांच्या लेकरांनी लुटून न्यावा आणि ह्यासाठी गुरुपौर्णिमा आणि अनिरुद्ध पौर्णिमा ह्या श्रद्धावान भक्तांसाठी दोन पर्वणीच आहेत.
श्रीसाईसच्चरितात आम्ही साईनाथांच्या मुखीचे बोल वाचतो -
उतून चालिला आहे खजिना । एकही कोणी गाडया आणीना ।
खणा म्हणतां कोणीही खणीना । प्रयत्न कोणा करवेना ॥
मी म्हणें तो पैका खणावा । गाडयावारीं लुटून न्यावा ।
खरा माईचा पूत असावा । तेणेंच भरावा भांडार ॥ 
- श्रीसाईसच्चरित ३२ / १६२ व १६३
आमची झोळी भरून देण्यास सद्गुरुतत्त्व समर्थच आहे, आम्हाला फक्त अल्पसा प्रयास करावयाचा आहे, आमचाच भांडार भरण्यासाठी. आम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, गुरुपौर्णिमा आणि अनिरुद्ध पौर्णिमा या पर्वांवर सद्गुरुचरणी वारी करायची आहे. मीनावैनी म्हणतात त्याप्रमाणे अशा श्रद्धावानाच्या जीवनात अमावास्या असूच शकत नाही कारण त्याच्या जीवनात नित्य अनिरुद्ध पौर्णिमाच असते.

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll

Tuesday, 5 July 2016

Shivagangagauri-gadastotram (Sanskrit-Marathi)



।। हरि: ॐ ।।
05-07-2016

अथ श्री शिवगंगागौरी-गदास्तोत्रम्। 

मूळ संस्कृत - मराठी अर्थ










Tuesday, 8 March 2016