Showing posts with label aniruddha. Show all posts

Sunday, 10 May 2020

कणखर व्यक्तिमत्त्व - भाग 8 - एडी जाकू : आनंदी जीवनाचा वस्तुपाठ शिकवणारं व्यक्तिमत्त्व (Marathi-English)

।। हरि: ॐ ।। 

10-05-2020

कणखर व्यक्तिमत्त्व - भाग ८ 

एडी जाकू : आनंदी जीवनाचा वस्तुपाठ शिकवणारं व्यक्तिमत्त्व 

एडी जाकू यांचा जीवनविषयक दृष्टिकोन आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करताना मला ३१ डिसेंबर २०१९ रोजी साजरा झालेल्या भक्तिभाव चैतन्य महासत्संगातील सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या वाक्याची आठवण झाली - आनंद माझा आहे कारण सच्चिदानंद माझा आहे.

Wednesday, 8 April 2020

अंजनीमाता हम शरण में तुम्हारी (हिन्दी) (भक्तिस्वर्धुनी- १०)

।। हरि: ॐ ।।

07-02-2020
चैत्र पूर्णिमा
हनुमान पूर्णिमा

अंजनीमाता हम शरण में तुम्हारी  

(भक्तिस्वर्धुनी- १०)  

Thursday, 2 April 2020

Friday, 7 February 2020

Monday, 7 October 2019

तुम्हाला हृदयाशी धरेल माझा साईबाबा (मराठी) (भक्तिस्वर्धुनी- ०८)

।। हरि: ॐ ।।

08-10-2019
दसरा

तुम्हाला हृदयाशी धरेल माझा साईबाबा

(भक्तिस्वर्धुनी- ०८) 

Wednesday, 7 August 2019

जय कविकोकिल तुलसीदासजी (भक्तिस्वर्धुनी- ०६) - Hindi

।। हरि: ॐ ।।

07-08-2019

जय कविकोकिल तुलसीदासजी 

(भक्तिस्वर्धुनी- ०६) 

महान ग्रंथ श्रीरामचरितमानस के रचयिता सन्तश्रेष्ठ गोस्वामी श्री तुलसीदासजी की जयंती हमारे भारतवर्ष में श्रावण मास के शुक्ल पक्ष की सप्तमी को मनायी जाती है। सद्गुरु श्री अनिरुद्धजी सदा ही सन्तश्रेष्ठ गोस्वामी श्री तुलसीदासजी की महिमा का गान करते हैं। उन्होंने दैनिक प्रत्यक्ष में श्रीरामचरितमानस के सुन्दरकाण्ड पर आधारित ‘तुलसीपत्र’ इस अग्रलेखमालिका का लेखन भी किया है।
आज ८ अगस्त २०१९ को गोस्वामी श्री तुलसीदासजी की जयंती मनायी जा रही है। वे मेरे भी अत्यधिक प्रिय कवि हैं और परम-वन्दनीय हैं। आज के इस पावन पर्व पर गोस्वामी श्री तुलसीदासजी के चरणों में श्रद्धा एवं विनम्रतापूर्वक चंद पंक्तियाँ अर्पण कर रहा हूँ। श्रीराम।

Saturday, 20 July 2019

Tuesday, 21 May 2019

हनुमानजी ही सबसे सुन्दर (भक्तिस्वर्धुनी- ०४)

।। हरि: ॐ ।।

21-05-2019

हनुमानजी ही सबसे सुन्दर 

श्रद्धावान मित्रगणों को सादर अभिवादन! हिन्दी मेरी मातृभाषा तो नहीं है, परन्तु अत्यन्त प्रिय भाषा है। सन्तश्रेष्ठ श्री तुलसीदासजी मेरे अत्यन्त प्रिय सन्त हैं और उनके द्वारा विरचित श्रीरामचरितमानस का सुन्दरकाण्ड, हनुमानचलिसा इनका पाठ करते करते और सद्गुरु श्री अनिरुद्धजी द्वारा दैनिक प्रत्यक्ष में प्रकाशित हो रही सुन्दरकाण्ड पर आधारित तुलसीपत्र इस अग्रलेखमाला को पढते पढते रामदूत हनुमानजी के प्रति जो प्रेम हृदय में प्रवाहित हुआ, उसे इस रचना में अपने बालसुलभ शब्दों के द्वारा प्रकट किया  है, अत एव मुझसे लेखन में कोई त्रुटि हुई हो तो क्षमाप्रार्थी हूँ। 

Tuesday, 26 March 2019

एकनाथ-षष्ठी (Post in Marathi)

।। हरि: ॐ ।। 

26-03-2019
(एकनाथ-षष्ठी)

एकनाथ-षष्ठी 

आज एकनाथ-षष्ठी! माझे आजोळ औरंगाबादला असल्याने बालपणी न कळत्या वयात सर्वप्रथम आजी-आजोबांच्या कडेवर बसून पैठणला गेलो होतो. पैठणच्या त्या पहिल्या भेटीबद्दल मला आठवत नव्हतं, पण आजी-आजोबांकडूनच पुढे मला त्याबद्दल कळलं. त्यानंतर अनेक वेळा पैठणला गेलो, श्रेष्ठ भागवत सन्त एकनाथ महाराजांसमोर वारंवार नतमस्तक झालो आणि प्रत्येक वेळी एकनाथांबद्दलच्या प्रेमातील उत्कटता वाढतच गेली.
सन्त एकनाथांच्या दर्शनाची जेवढी ओढ मला सदैव लागलेली असायची, तेवढीच उत्कटता नेहमीच असायची, सन्त एकनाथांच्या वाड्यातील विजयी पांडुरंगाला पाहण्याची आणि श्रीखंड्याच्या रूपात स्वत: भगवंत ज्या रांजणात पाणी भरायचा त्या रांजणाचे दर्शन घेण्याची, श्रीखंड्या ज्या सहाणेवर गन्ध उगाळायचा त्या सहाणेस पाहण्याची, तसेच सन्त एकनाथ महाराज आणि श्रीखंड्या यांची चरणधूळ मस्तकी लावण्याची.
सन्त एकनाथांच्या विठ्ठलभक्तीबद्दल आणि विशेषत: भगवंताच्या आपल्या या लाडक्या भक्तावर असलेल्या अपरंपार प्रेमाबद्दल व भगवंताने तब्बल बारा वर्षे केलेल्या भक्तसेवेबद्दल जेव्हा मनात विचार येतो, तेव्हा हृदय भरून येतं, भाव दाटून येतात आणि मन लोटांगणं घालतं.
सद्गुरु श्री अनिरुद्ध (बापू) नेहमीच सन्तश्रेष्ठ एकनाथांबद्दल भरभरून बोलतात. बापू स्वत: पैठणला गेले होते, तेव्हा २०१० सालची त्यांची ती भेट अविस्मरणीय होती. सन्त एकनाथांबद्दलचे भरभरून वाहणारे प्रेम बापुंच्या डोळ्यांतून ओसंडून वाहत होते. सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत असणार्‍या ‘अनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ (एएडीएम) चे तत्पर असलेले प्रशिक्षीत स्वयंसेवक गेली अनेक वर्षे पैठण येथे एकनाथषष्ठीला दर्शनरांग व्यवस्थापन कार्यात आपली सेवा भगवंताच्या चरणी रुजू करत आहेत.
सन्त एकनाथांच्या वाड्यातील विजयी पांडुरंगाबद्दल, त्या रांजणाबद्दल लिहिण्याचं नेहमीच मनात येई. त्या ऊर्मीतूनच माहिती गोळा करत राहिलो आणि त्या अभ्यासातून हा संक्षिप्त लेख तयार झाला. यथामती लिहिलेल्या या लेखात काही त्रुटी असू शकतील, तरी तज्ञांनी अवश्य मार्गदर्शन करावे.
आजच्या एकनाथषष्ठीच्या या पावन पर्वावर ही शब्दरूपी सुमनमाला सन्त एकनाथ महाराजांच्या व श्री पांडुरंगाच्या चरणी अर्पण करत आहे. अंबज्ञ. नाथसंविध्. 

Thursday, 9 August 2018