Wednesday 23 April 2014

वास्तुविषयक मार्गदर्शन (Post in Marathi)

।। हरि: ॐ ।।



23-04-2014


वास्तुविषयक मार्गदर्शन

ही माहिती संग्रहित असून यात काही त्रुटी असू शकतात, तरी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, ही विनंती.

1) स्वत:च्या घरी दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.

2) घरात बाहेरून आत प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला प्रथम भगवंताचे दर्शन व्हायला हवे. बाहेरून घरात येणाऱ्या व्यक्तीच्या वाईट विचारांना भगवंत रोखून धरतो आणि त्या वाईट विचार घेऊन येणाऱ्याचे बळ कमी होते.

3) स्वयंपाकघरातील चुलीसमोरच्या भिंतीवर भगवंताचा फोटो असलाच पाहिजे. त्यामुळे शिजणाऱ्या अन्नावर भगवंताची कृपादृष्टी पडते.

4) स्नानगृहामध्ये, स्नानाचे पाणी ज्या नळातून येते, त्या नळाच्या भिंतीच्या वरील भागात अष्टगंध, चन्दन किंवा हळद यांपैकी कोणत्याही एका गोष्टीने स्वस्तिक काढावे. जर काही दिवसांत पुसले गेले तर पुन्हा काढावे. स्नान करताना "ॐ ग्लौं (सद्‌गुरुनाम-चतुर्थी उदा. श्रीसाईनाथाय/श्रीस्वामीसमर्थाय) नम:' म्हणत रहावे किंवा सद्‌गुरुनाम घेत रहावे.

वास्तुदोषावरील रामबाण उपाय

*1) श्रीगुरुक्षेत्रम्‌ मन्त्र आणि श्रीगुरुक्षेत्रम्‌चे दर्शन घेणे.

*2) वास्तुमध्ये कुठल्याही एका मंगळवारी आदिमाता चण्डिकेचा फोटो छातीच्या डाव्या बाजूला (हृदयाशी) धरून सर्व घरात फिरत राहणे.
कसे व किती फिरावे?
दिवस-रात्र मिळून आठ प्रहर होतात. हे आठ भाग पुढीलप्रमाणे आहेत-
1) रात्री 11.30 ते रात्री 02.30
2) रात्री 02.30 ते पहाटे 05.30
3) पहाटे 05.30 ते सकाळी 08.30
4) सकाळी 08.30 ते दुपारी 11.30
5) दुपारी 11.30 ते दुपारी 02-30
6) दुपारी 02.30 ते संध्याकाळी 05.30
7) संध्याकाळी 05.30 ते रात्री 08.30
8) रात्री 08.30 ते रात्री 11.30
या प्रत्येक भागात कमीत कमी सहा मिनिटे अशा प्रकारे आठही प्रहरांमध्ये पूर्ण घरात फिरणे.
ज्या मंगळवारी हे करण्याचे ठरवले असेल, त्या मंगळवारी म्हणजे त्या दिवशी घरातील कोणत्याही व्यक्तीचा वाढदिवस असता कामा नये किंवा अमावास्याही असता कामा नये.
दर दीड वर्षांनी पुन्हा पुन्हा हे करत रहावे.

*3) वास्तुवर अशुभाचे सावट आहे, काहीतरी वाईट स्पन्दने जाणवत आहेत असे वाटत असेल, तर कुठल्याही पौर्णिमेला डाव्या हातात उदीचे भांडे घेऊन उजव्या हाताने उंबरठ्यापासून उदी लावत राहणे. उदा. उंबरठा, दरवाजा, खिडकी, कपाट, भिंत वगैरे. उदी ओली न करता कोरडीच लावणे. अगदी स्नानगृह, शौचालयाच्याही भिंती, दरवाजे, खिडक्यांनासुद्धा  उदी लावावी. उदी लावताना फक्त "श्रीगुरु' एवढेच म्हणत रहावे.
दर दीड वर्षांनी पुन्हा पुन्हा हे करत रहावे.

*4) चण्डिकाप्रपत्ति करणे. स्त्री व पुरुष श्रद्धावानांनी वार्षिक प्रपत्ति करणे.

।। हरि: ॐ ।।