Tuesday 18 July 2017

घोरकष्टोद्धरण स्तोत्र - एक अध्ययन

।। हरि: ॐ ।। 

18-07-2017

घोरकष्टोद्धरण स्तोत्र 

एक अध्ययन




सुविख्यात दत्तभक्त संत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी (टेंबे स्वामी) यांच्या अनेक दत्तभक्तिपर प्रासादिक रचनांमधील एक रचना आहे - घोरकष्टोद्धरण स्तोत्र. काही ठिकाणी याचा उल्लेख ‘अघोरकष्टोद्धरण स्तोत्र’ असाही केला जातो. 

दर वर्षी पावन श्रावण महिन्यात सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार या घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे दररोज सकाळी १०८ वेळा व संध्याकाळी १०८ वेळा ह्याप्रमाणे श्रद्धावानांकडून श्रद्धेने पठण केले जाते.

या घोरकष्टोद्धरण स्तोत्राचा अर्थ संधिविच्छेदासह यथामति देत आहे. काही त्रुटी असल्यास जाणकारांनी सूचित करावे.
ही छोटीशी सेवा सद्गुरुचरणी अर्पण करत आहे.