Showing posts with label Thorn. Show all posts
Showing posts with label Thorn. Show all posts

Saturday, 19 September 2020

काट्यांची गजल (Marathi)

 ।। हरि: ॐ ।। 

19-09-2020

काट्यांची गजल  

आज बर्‍याच वर्षांनी एका मित्राचा फोन आला. त्याचा आणि माझा गेल्या २७ वर्षांत काही संपर्क नव्हता. त्याला माझा नंबर मिळाला म्हणून त्याने फोन केला. त्याच्याकडून त्याच्या आयुष्याचा खडतर प्रवास कळला आणि आजही त्याच्या नशिबात काटे रुतणेच आहे हे त्याच्या बोलण्यातून जाणवले. त्याची जीवनाबद्दल किंवा कुणाबद्दल काही तक्रार नव्हती. मला त्याची व्यथा-वेदना ऐकून खूप वाईट वाटले. मी त्याला म्हटले की देवाकडे प्रार्थना करीन. देव करो आणि कुणावरही अशी परिस्थिती न येवो. मला धन्यवाद देत तो म्हणाला, आता काट्यांशीच मैत्री झाली आहे रे, काट्यांशिवाय करमणारच नाही. त्याचे हे वाक्य मनात खूप खोलवर रुतले आणि त्यानंतर सुचलेल्या या काही ओळी.