Thursday 22 February 2018

समर्थशिष्य कल्याणस्वामी - भाग १ (Post in Marathi)

।। हरि: ॐ ।। 

22-02-2018

समर्थशिष्य कल्याणस्वामी

भाग १

(उत्कला, आर्चिक, उत्कर्ष, अंगद, एकलव्य अशा माझ्या बालमित्रांना सांगण्यासाठी सन्तश्रेष्ठ श्री समर्थ रामदासस्वामी यांचे सत्-शिष्य श्री कल्याणस्वामी यांच्या कथा यथाशक्ति संग्रहित करून यथामति माझ्या भाषेत त्यांना सांगितल्या. कल्याणस्वामींच्या कथा सांगण्यामागे माझा हाच उद्देश होता की माझ्या बालमित्रांच्या मनात कल्याणस्वामींच्या चरित्रास जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण व्हावी. माझ्या बालमित्रांची या कथांमध्ये रुचि वाढावी, कथांची गोडी लागावी यासाठी कथांच्या मूळ आशयाला अबाधित राखून कथांमधील भक्तिरंग खुलवण्यापुरते स्वातन्त्र्यही घेतले आहे. त्याबद्दल जाणकार क्षमा करतील. या मालिकेचा उद्देश समर्थ रामदासस्वामी आणि कल्याणस्वामी या सद्गुरु-सत्-शिष्यांच्या जोडीबद्दल बालमित्रांच्या मनात औत्सुक्य निर्माण करणे हाच आहे. समर्थ रामदासस्वामी आणि कल्याणस्वामी या सद्गुरु-सत्-शिष्यांना कोटी कोटी साष्टांग प्रणाम. अंबज्ञ. नाथसंविध्.)