।। हरि: ॐ ।।
06-01-2018
वात्सल्यगंगा अस्माकं मातामही
नातवंडांसाठी आजी आणि आजीसाठी नातवंडं म्हणजे अवघे प्रेम, अवघा आनन्द. माझी आजी सौ. कुन्दा हरि कर्वे हिच्या एका वाढदिवसाला मी ही कविता तिला लिहून दिली होती. आज जुनी कागदपत्रे शोधताना अचानक त्या कवितेचे हस्तलिखित मला सापडले. आजीवर लिहिलेली एक मराठी कविताही गवसली. तीदेखील येथे प्रकाशित करीन.
आजीला ही कविता मी दिली, तेव्हा आजीच्या डोळ्यांत नातवाबद्दल ओसंडून वाहणारं कौतुक आजही मला आठवतं. माझ्या आजीमुळेच मला संस्कृतची गोडी लागली. आज आजी देहरूपाने या जगात नसली तरी आशीर्वाद आणि वात्सल्यरूपात सदैव माझ्यासह आहेच. सरस्वतीची आजन्म उपासना करणार्या आजीसाठी लिहिलेल्या या ओळी सरस्वतीचरणी अर्पण करतो. आजीची माया अनुभवलेल्या प्रत्येकाला हे आपलंसं वाटेल. मला अशी आजी लाभली त्याबद्दल सदगुरु आणि चण्डिकाकुलाला अंबज्ञ. नाथसंविध्.