‘अंबज्ञोऽस्मि’ ‘नाथसंविध्’ ‘अंबज्ञोऽस्मि’ का अर्थ है-मैं अंबज्ञ हूँ। अंबज्ञता का अर्थ है-आदिमाता के प्रति श्रद्धावान के मन में होनेवाली और कभी भी न ढल सकनेवाली असीम सप्रेम कृतज्ञता। (संदर्भ–मातृवात्सल्य उपनिषद्) नाथसंविध् अर्थात् निरंजननाथ, सगुणनाथ और सकलनाथ इन तीन नाथों की इच्छा, प्रेम, करुणा, क्षमा और सामर्थ्य सहायता इन पंचविशेषों के द्वारा बनायी गयी संपूर्ण जीवन की रूपरेखा। (संदर्भ–तुलसीपत्र १४२९)
Showing posts with label poet. Show all posts
Showing posts with label poet. Show all posts
Wednesday, 18 March 2020
Thursday, 6 February 2020
खिडकीत उभी ती.....
Monday, 3 February 2020
ती म्हणायची तू पावसासारखा येतोस (Marathi Kavita)
Wednesday, 8 January 2020
सूर्य उतरता, वाट उतरती..... (Marathi)
।। हरि: ॐ ।।
08-01-2020
सूर्य उतरता, वाट उतरती.....
माझा मित्र चेतन महाजन याने आमच्या शाळेच्या ग्रुपवर शेअर केलेल्या, सूर्यास्तसमयीच्या एका उतरत्या वाटेच्या फोटोवरून मला सहज काही ओळी सुचल्या. मित्राने काढलेल्या फोटोसह त्या ओळी येथे शेअर करत आहे.
सूर्य उतरता, वाट उतरती, वयाच्या या उतरणीवरती,
चढती राहील ऊर्जा माझी अडचणींच्या चढणीवरती.
हृदयी उत्साहाची ज्वाला अन् जिद्दीची मशाल हाती,
प्रकाश-पुंजी आहे पुरेशी वाट उजळण्या माझ्यापुरती.
गर्द रानच्या आपदारूपी श्वापदांची ना मज भीती,
अचूकतेचा शर मी खोचला विश्वासाच्या धनुष्यावरती.
विपरीतचि का विचार-वाटा, सकारात्मक माझी दृष्टी,
देव नेतसे मजसी तेथे जी मजसाठी अचिन्त्य सृष्टी.
झुळझुळणारा झरा नि वारा करतील स्वागत वळणावरती,
पाकळ्यांच्या पायघड्यांची असेल वस्ती वाटेवरती.
धैर्य-रात्रीच्या बोगद्यापार वाट दूत तेजाचे पाहती,
समर्थ माझी निश्चय-पणती, असो धुके की अंधार भोवती.
सहस्र ताऱ्यांच्या नेत्रांनी जगदंबाचि होय रक्षिती,
माउलीची प्रेम-शिदोरी हीच ताकद, हीच फलश्रुती.
भगीरथाचा वारस मी पथ बनवत जातो पुढती,
ध्येय धावते पाठी, प्रवास करवी श्रम-भागीरथी.
- डॉ. योगीन्द्रसिंह जोशी
॥ अंबज्ञोऽस्मि ॥
http://ambajnosmi.blogspot.in
सूर्य उतरता, वाट उतरती.....
माझा मित्र चेतन महाजन याने आमच्या शाळेच्या ग्रुपवर शेअर केलेल्या, सूर्यास्तसमयीच्या एका उतरत्या वाटेच्या फोटोवरून मला सहज काही ओळी सुचल्या. मित्राने काढलेल्या फोटोसह त्या ओळी येथे शेअर करत आहे.सूर्य उतरता, वाट उतरती, वयाच्या या उतरणीवरती,
चढती राहील ऊर्जा माझी अडचणींच्या चढणीवरती.
हृदयी उत्साहाची ज्वाला अन् जिद्दीची मशाल हाती,
प्रकाश-पुंजी आहे पुरेशी वाट उजळण्या माझ्यापुरती.
गर्द रानच्या आपदारूपी श्वापदांची ना मज भीती,
अचूकतेचा शर मी खोचला विश्वासाच्या धनुष्यावरती.
विपरीतचि का विचार-वाटा, सकारात्मक माझी दृष्टी,
देव नेतसे मजसी तेथे जी मजसाठी अचिन्त्य सृष्टी.
झुळझुळणारा झरा नि वारा करतील स्वागत वळणावरती,
पाकळ्यांच्या पायघड्यांची असेल वस्ती वाटेवरती.
धैर्य-रात्रीच्या बोगद्यापार वाट दूत तेजाचे पाहती,
समर्थ माझी निश्चय-पणती, असो धुके की अंधार भोवती.
सहस्र ताऱ्यांच्या नेत्रांनी जगदंबाचि होय रक्षिती,
माउलीची प्रेम-शिदोरी हीच ताकद, हीच फलश्रुती.
भगीरथाचा वारस मी पथ बनवत जातो पुढती,
ध्येय धावते पाठी, प्रवास करवी श्रम-भागीरथी.
- डॉ. योगीन्द्रसिंह जोशी
॥ अंबज्ञोऽस्मि ॥
http://ambajnosmi.blogspot.in
Labels:
hill,
inspirational,
kavita,
life,
marathi,
motivational,
nature,
path,
poem,
poet,
poetry,
sun
Monday, 16 December 2019
मैत्री यालाच म्हणतात का .....
।। हरि: ॐ ।।
16-12-2019
शाळेत रोज ज्याच्याबरोबर जायचो आणि यायचो, ज्याचं घर हे माझं हक्काचं घर
होतं, माझ्या सुखदु:खात मला ज्याने साथ दिली, मित्र म्हटलं की मला पटकन
ज्याची आठवण होते, तो माझा बालमित्र पूर्वेश शेलटकर याच्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरकृपेने सुचलेल्या काही ओळी, माझ्या मित्राच्या अभीष्टचिन्तनासह
त्याला त्याच्या दोस्ताने दिलेली ही छोटीशी भेट. त्याच्याच वाढदिवशी (१३
डिसेंबर २०१९) लिहिलेल्या या ओळी खरं तर त्याच दिवशी त्याला पाठवणार होतो,
पण टंकलेखनात (टाईप करण्यात) उशीर झाल्यामुळे आज पोस्ट करत आहे.
मैत्री यालाच म्हणतात का ......
Monday, 25 November 2019
Friday, 22 November 2019
Wednesday, 20 November 2019
Monday, 14 October 2019
Saturday, 31 August 2019
लिहू कसा तुझ्यावरी (Marathi Kavita)
।। हरि: ॐ ।।
31-08-2019
लिहू कसा तुझ्यावरी
मी आणि माझी पत्नी विशाखा, आमच्या प्रेमविवाहास या वर्षी आई जगदंबेच्या कृपेने आणि सद्गुरुंच्या आशीर्वादाने या वर्षी १ फेब्रुवारीस २१ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त माझ्याकडून माझ्या सहधर्मचारिणीस काही प्रेमकवितांची भेट देण्याचा संकल्प मी केला होता आणि चण्डिकाकुलकृपेने काही रचना त्यानंतर घडल्या. त्यांतील काही रचना येथे प्रस्तुत करत आहे.
प्रेमावर, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीवर काही लिहावे म्हटले आणि कितीही लिहिले तरी त्यात सर्व काही व्यक्त होत नाही, बरेच काही राहून जाते. याच भावनेस व्यक्त केले आहे, ‘लिहू कसा तुझ्यावरी’ या रचनेत. पहिल्याच भेटीत प्रियकरावर जादू करणार्या प्रेयसीबाबत त्या प्रियकराच्या हृदयात उठलेला भावनिर्झर वाहताना म्हणत आहे, ‘लिहू कसा तुझ्यावरी’.

Wednesday, 26 June 2019
मैत्रीच्या पावसात भिजवणारा आनंदऋतु (Marathi)
Subscribe to:
Posts (Atom)