।। हरि: ॐ ।।
08-01-2020
सूर्य उतरता, वाट उतरती.....
माझा मित्र चेतन महाजन याने आमच्या शाळेच्या ग्रुपवर शेअर केलेल्या, सूर्यास्तसमयीच्या एका उतरत्या वाटेच्या फोटोवरून मला सहज काही ओळी सुचल्या. मित्राने काढलेल्या फोटोसह त्या ओळी येथे शेअर करत आहे.
सूर्य उतरता, वाट उतरती, वयाच्या या उतरणीवरती,
चढती राहील ऊर्जा माझी अडचणींच्या चढणीवरती.
हृदयी उत्साहाची ज्वाला अन् जिद्दीची मशाल हाती,
प्रकाश-पुंजी आहे पुरेशी वाट उजळण्या माझ्यापुरती.
गर्द रानच्या आपदारूपी श्वापदांची ना मज भीती,
अचूकतेचा शर मी खोचला विश्वासाच्या धनुष्यावरती.
विपरीतचि का विचार-वाटा, सकारात्मक माझी दृष्टी,
देव नेतसे मजसी तेथे जी मजसाठी अचिन्त्य सृष्टी.
झुळझुळणारा झरा नि वारा करतील स्वागत वळणावरती,
पाकळ्यांच्या पायघड्यांची असेल वस्ती वाटेवरती.
धैर्य-रात्रीच्या बोगद्यापार वाट दूत तेजाचे पाहती,
समर्थ माझी निश्चय-पणती, असो धुके की अंधार भोवती.
सहस्र ताऱ्यांच्या नेत्रांनी जगदंबाचि होय रक्षिती,
माउलीची प्रेम-शिदोरी हीच ताकद, हीच फलश्रुती.
भगीरथाचा वारस मी पथ बनवत जातो पुढती,
ध्येय धावते पाठी, प्रवास करवी श्रम-भागीरथी.
- डॉ. योगीन्द्रसिंह जोशी
॥ अंबज्ञोऽस्मि ॥
http://ambajnosmi.blogspot.in
सूर्य उतरता, वाट उतरती.....
माझा मित्र चेतन महाजन याने आमच्या शाळेच्या ग्रुपवर शेअर केलेल्या, सूर्यास्तसमयीच्या एका उतरत्या वाटेच्या फोटोवरून मला सहज काही ओळी सुचल्या. मित्राने काढलेल्या फोटोसह त्या ओळी येथे शेअर करत आहे.सूर्य उतरता, वाट उतरती, वयाच्या या उतरणीवरती,