।। हरि: ॐ ।।
31-08-2019
लिहू कसा तुझ्यावरी
मी आणि माझी पत्नी विशाखा, आमच्या प्रेमविवाहास या वर्षी आई जगदंबेच्या कृपेने आणि सद्गुरुंच्या आशीर्वादाने या वर्षी १ फेब्रुवारीस २१ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त माझ्याकडून माझ्या सहधर्मचारिणीस काही प्रेमकवितांची भेट देण्याचा संकल्प मी केला होता आणि चण्डिकाकुलकृपेने काही रचना त्यानंतर घडल्या. त्यांतील काही रचना येथे प्रस्तुत करत आहे.
प्रेमावर, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीवर काही लिहावे म्हटले आणि कितीही लिहिले तरी त्यात सर्व काही व्यक्त होत नाही, बरेच काही राहून जाते. याच भावनेस व्यक्त केले आहे, ‘लिहू कसा तुझ्यावरी’ या रचनेत. पहिल्याच भेटीत प्रियकरावर जादू करणार्या प्रेयसीबाबत त्या प्रियकराच्या हृदयात उठलेला भावनिर्झर वाहताना म्हणत आहे, ‘लिहू कसा तुझ्यावरी’.