‘अंबज्ञोऽस्मि’ ‘नाथसंविध्’ ‘अंबज्ञोऽस्मि’ का अर्थ है-मैं अंबज्ञ हूँ। अंबज्ञता का अर्थ है-आदिमाता के प्रति श्रद्धावान के मन में होनेवाली और कभी भी न ढल सकनेवाली असीम सप्रेम कृतज्ञता। (संदर्भ–मातृवात्सल्य उपनिषद्) नाथसंविध् अर्थात् निरंजननाथ, सगुणनाथ और सकलनाथ इन तीन नाथों की इच्छा, प्रेम, करुणा, क्षमा और सामर्थ्य सहायता इन पंचविशेषों के द्वारा बनायी गयी संपूर्ण जीवन की रूपरेखा। (संदर्भ–तुलसीपत्र १४२९)
Showing posts with label maharaj. Show all posts
Showing posts with label maharaj. Show all posts
Saturday, 14 March 2020
Tuesday, 16 April 2019
Thursday, 4 April 2019
Tuesday, 26 March 2019
एकनाथ-षष्ठी (Post in Marathi)
।। हरि: ॐ ।।
26-03-2019
(एकनाथ-षष्ठी)
एकनाथ-षष्ठी
आज
एकनाथ-षष्ठी! माझे आजोळ औरंगाबादला असल्याने बालपणी न कळत्या वयात
सर्वप्रथम आजी-आजोबांच्या कडेवर बसून पैठणला गेलो होतो. पैठणच्या त्या
पहिल्या भेटीबद्दल मला आठवत नव्हतं, पण आजी-आजोबांकडूनच पुढे मला त्याबद्दल
कळलं. त्यानंतर अनेक वेळा पैठणला गेलो, श्रेष्ठ भागवत सन्त एकनाथ
महाराजांसमोर वारंवार नतमस्तक झालो आणि प्रत्येक वेळी एकनाथांबद्दलच्या
प्रेमातील उत्कटता वाढतच गेली.
सन्त एकनाथांच्या दर्शनाची जेवढी ओढ
मला सदैव लागलेली असायची, तेवढीच उत्कटता नेहमीच असायची, सन्त एकनाथांच्या
वाड्यातील विजयी पांडुरंगाला पाहण्याची आणि श्रीखंड्याच्या रूपात स्वत:
भगवंत ज्या रांजणात पाणी भरायचा त्या रांजणाचे दर्शन घेण्याची, श्रीखंड्या
ज्या सहाणेवर गन्ध उगाळायचा त्या सहाणेस पाहण्याची, तसेच सन्त एकनाथ महाराज
आणि श्रीखंड्या यांची चरणधूळ मस्तकी लावण्याची. सन्त एकनाथांच्या विठ्ठलभक्तीबद्दल आणि विशेषत: भगवंताच्या आपल्या या लाडक्या भक्तावर असलेल्या अपरंपार प्रेमाबद्दल व भगवंताने तब्बल बारा वर्षे केलेल्या भक्तसेवेबद्दल जेव्हा मनात विचार येतो, तेव्हा हृदय भरून येतं, भाव दाटून येतात आणि मन लोटांगणं घालतं.
सद्गुरु श्री अनिरुद्ध (बापू) नेहमीच सन्तश्रेष्ठ एकनाथांबद्दल भरभरून बोलतात. बापू स्वत: पैठणला गेले होते, तेव्हा २०१० सालची त्यांची ती भेट अविस्मरणीय होती. सन्त एकनाथांबद्दलचे भरभरून वाहणारे प्रेम बापुंच्या डोळ्यांतून ओसंडून वाहत होते. सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत असणार्या ‘अनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ (एएडीएम) चे तत्पर असलेले प्रशिक्षीत स्वयंसेवक गेली अनेक वर्षे पैठण येथे एकनाथषष्ठीला दर्शनरांग व्यवस्थापन कार्यात आपली सेवा भगवंताच्या चरणी रुजू करत आहेत.
सन्त एकनाथांच्या वाड्यातील विजयी पांडुरंगाबद्दल, त्या रांजणाबद्दल लिहिण्याचं नेहमीच मनात येई. त्या ऊर्मीतूनच माहिती गोळा करत राहिलो आणि त्या अभ्यासातून हा संक्षिप्त लेख तयार झाला. यथामती लिहिलेल्या या लेखात काही त्रुटी असू शकतील, तरी तज्ञांनी अवश्य मार्गदर्शन करावे.
आजच्या एकनाथषष्ठीच्या या पावन पर्वावर ही शब्दरूपी सुमनमाला सन्त एकनाथ महाराजांच्या व श्री पांडुरंगाच्या चरणी अर्पण करत आहे. अंबज्ञ. नाथसंविध्.
आज एकनाथ-षष्ठी! माझे आजोळ औरंगाबादला असल्याने बालपणी न कळत्या वयात सर्वप्रथम आजी-आजोबांच्या कडेवर बसून पैठणला गेलो होतो. पैठणच्या त्या पहिल्या भेटीबद्दल मला आठवत नव्हतं, पण आजी-आजोबांकडूनच पुढे मला त्याबद्दल कळलं. त्यानंतर अनेक वेळा पैठणला गेलो, श्रेष्ठ भागवत सन्त एकनाथ महाराजांसमोर वारंवार नतमस्तक झालो आणि प्रत्येक वेळी एकनाथांबद्दलच्या प्रेमातील उत्कटता वाढतच गेली.
सन्त एकनाथांच्या दर्शनाची जेवढी ओढ मला सदैव लागलेली असायची, तेवढीच उत्कटता नेहमीच असायची, सन्त एकनाथांच्या वाड्यातील विजयी पांडुरंगाला पाहण्याची आणि श्रीखंड्याच्या रूपात स्वत: भगवंत ज्या रांजणात पाणी भरायचा त्या रांजणाचे दर्शन घेण्याची, श्रीखंड्या ज्या सहाणेवर गन्ध उगाळायचा त्या सहाणेस पाहण्याची, तसेच सन्त एकनाथ महाराज आणि श्रीखंड्या यांची चरणधूळ मस्तकी लावण्याची. सन्त एकनाथांच्या विठ्ठलभक्तीबद्दल आणि विशेषत: भगवंताच्या आपल्या या लाडक्या भक्तावर असलेल्या अपरंपार प्रेमाबद्दल व भगवंताने तब्बल बारा वर्षे केलेल्या भक्तसेवेबद्दल जेव्हा मनात विचार येतो, तेव्हा हृदय भरून येतं, भाव दाटून येतात आणि मन लोटांगणं घालतं.
सद्गुरु श्री अनिरुद्ध (बापू) नेहमीच सन्तश्रेष्ठ एकनाथांबद्दल भरभरून बोलतात. बापू स्वत: पैठणला गेले होते, तेव्हा २०१० सालची त्यांची ती भेट अविस्मरणीय होती. सन्त एकनाथांबद्दलचे भरभरून वाहणारे प्रेम बापुंच्या डोळ्यांतून ओसंडून वाहत होते. सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत असणार्या ‘अनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ (एएडीएम) चे तत्पर असलेले प्रशिक्षीत स्वयंसेवक गेली अनेक वर्षे पैठण येथे एकनाथषष्ठीला दर्शनरांग व्यवस्थापन कार्यात आपली सेवा भगवंताच्या चरणी रुजू करत आहेत.
सन्त एकनाथांच्या वाड्यातील विजयी पांडुरंगाबद्दल, त्या रांजणाबद्दल लिहिण्याचं नेहमीच मनात येई. त्या ऊर्मीतूनच माहिती गोळा करत राहिलो आणि त्या अभ्यासातून हा संक्षिप्त लेख तयार झाला. यथामती लिहिलेल्या या लेखात काही त्रुटी असू शकतील, तरी तज्ञांनी अवश्य मार्गदर्शन करावे.
आजच्या एकनाथषष्ठीच्या या पावन पर्वावर ही शब्दरूपी सुमनमाला सन्त एकनाथ महाराजांच्या व श्री पांडुरंगाच्या चरणी अर्पण करत आहे. अंबज्ञ. नाथसंविध्.
Monday, 31 December 2018
कथा-अभीष्टा - १९ बुद्धि दे रघुनायका ! (A Story in Marathi)
।। हरि: ॐ।।
31-12-2018
कथा-अभीष्टा - १९
आज श्रेष्ठ सन्त परमपूज्य सद्गुरु ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांचा महासमाधि-स्मरण दिवस. सोमवार, मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके १८३५ म्हणजेच दिनांक २२ डिसेंबर १९१३ रोजी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी ‘जेथें नाम, तेथें माझे प्राण, ही सांभाळावी खूण’ हे निरोपाचे शब्द उच्चारून महाराजांनी इहलोकाचा निरोप घेतला. परमपूज्य महाराजांच्या चरणी आजची ही कथा अर्पण करत आहे.
बुद्धि दे रघुनायका!
Subscribe to:
Posts (Atom)