।। हरि: ॐ ।।
22-05-2014
त्रिविक्रम जल
त्रिविक्रम जलाची बाटली एक वर्षानंतर गुरुक्षेत्रम्मध्ये येऊन पुढील विधिने बाटली पुन्हा भारित म्हणजेच सिद्ध करून घ्यावी.
विधि-
१) एकदा गुरुक्षेत्रम्मंत्र म्हणावा.
२) ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रंम्।
ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥’
हा मंत्र अकरा वेळा म्हणावा.
३) पुन्हा एकदा गुरुक्षेत्रम्मंत्र म्हणावा.
काही अपरिहार्य कारणामुळे एक वर्षानंतर गुरुक्षेत्रम्ला येऊन बाटली सिद्ध करणे शक्य न झाल्यास म्हणजेच एक वर्षापेक्षा अधिक काळ झाल्यास ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम्। ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥’ हा मंत्र ११ ऐवजी २२ वेळा म्हणावा, असाही पर्याय सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी दिला आहे.