।। हरि: ॐ ।।
06-10-2014
अनिरुद्ध पौर्णिमा
अंबज्ञ योगी बनलो राहून बापुपायी
मातेसम नाही कोणी, आई ती फक्त आई
योगीचे फक्त आहेत बापु आणि मोठी आई
स्वार्थी जगामधे या निरपेक्ष प्रेम आई
प्रार्थी सदैव बाळाचे स्वस्तिक्षेम आई
मज वाढविण्यासाठी करी त्याग सर्वकाही
किती केले याची गणती स्वप्नीही करत नाही
भक्ताची भक्ती करतो असा देव तू गं आई
न वसेच शब्दकोशी शाप तुझ्या कधीही
मजसाठी आटवीते स्वतःचे रक्त आई
वाहे उपाशी असूनि पान्हा जिचा ती आई
निघती कृतघ्न लेक, वात्सल्य तरीही वाही
मी कितीही घाण असलो तरी तीच जवळ घेई
पर्याय पर्यायासी मिळतील या जगीही
आईस पण कदापि पर्याय कुण्णी नाही
इतुकेच जाणतो मी सर्वस्व माझे आई
अंबज्ञ योगी बनलो राहून बापुपायी
-Dr. Yogindrasinh Joshi
Happy
Birthday Bapu!
I love you my Dad!
अंबज्ञोऽस्मि ।
।। हरि: ॐ
।।