Wednesday, 19 August 2020

आई, तू कधी मला ओझं होऊच दिलं नाहीस (Marathi)

 ।। हरि: ॐ ।। 

19-08-2020

आई, तू कधी मला ओझं होऊच दिलं नाहीस 

मातृदिन, श्रावण अमावस्या - पिठोरी अमावस्या.
भारतवर्षामध्ये श्रावण अमावस्या म्हणजेच 'पिठोरी अमावस्या' ही मातृदिन म्हणून साजरी करतात. आपल्या लेकरांचे आयुष्य वाढावे, वंश वाढावा या प्रार्थनेसह माता या दिवशी चौसष्ट योगिनींची पूजा करते. ज्या आईची मुले अल्पायुषी ठरतात किंवा जिला अपत्यसुख लाभत नाही, अशी आईसुद्धा पिठोरी अमावस्या व्रत करते. आईच्या कधीही न फिटणार्‍या ऋणांची अखंड जाणीव ठेवत तिच्या चरणांशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. त्यासाठी माझ्याकडून मातेचरणी ही कृतज्ञतांजलि.